बिजिंग | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने एशियन गेम्स 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्ण कामगिरी केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात महिला टीमने गोल्डन मेडलवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता मेन्स क्रिकेट टीम इंडिया एशियन गेम्समध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया एशियन गेम्समध्ये खेळण्यासाठी चीनमध्ये पोहचली आहे. टीम इंडिया एथेलिट्स व्हिलेज इथे दाखल झाली आहे. टीम इंडिया या ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये टीम इंडियाचे 2 फोटो शेअर करण्यात आले आहेत.
टीम इंडियाचा मुख्य संघ हा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करतोय. त्यामुळे एशियन गेम्समध्ये अनेक युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. या युवा टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी ही पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली आहे. त्यामुळे एशियन गेम्समध्ये ऋतुराजच्या अनुभवाचा कस लागणार आहे.
टीम इंडिया एथलिट व्हिलेजमध्ये दाखल
Our Men’s Cricket Team has arrived at the Athlete’s Village! 🏏
They will be in action starting 3rd October in the Quarter Finals.
Let’s #Cheer4india 🇮🇳 #WeAreTeamIndia | #IndiaAtAG22 | @BCCI | #Cricket pic.twitter.com/loaiX4gJSp
— Team India (@WeAreTeamIndia) October 1, 2023
टीम इंडिया या स्पर्धेत थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाने आयसीसी रँकिंगमधील स्थानाच्या जोरावर थेट क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली आहे. टीम इंडियाचा क्वार्टर फायनलमधील सामना हा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान असणार हे अजून निश्चित नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एशियन गेम्स स्पर्धेच्या टीममधून शिवम मावी हा बाहेर झाला. शिवमला दुखापतीमुळे एशियन गेम्समधून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे शिवमच्या जागी आकाश दीप याला संधी देण्यात आली आहे.
एशियन गेम्स 2023 स्पर्धेसाठी मेन्स टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.