मुंबई : एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये (Asian Game IND vs BAN) टीम इंडियाने बांगलादेशवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश करत एशियन गेम्समध्ये आणखी एक पदक निश्चित केलंय. बांगलदेशने दिलेल्या 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या भिडूंनी 10 व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत सामना संपवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांच्या नाबाद खेळीने सामना सहज खिशात घातला.
टॉस जिंकत टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला, बांगलादेश संघाने 20 ओव्हरमध्ये 96-9 धावा केल्या. बांगलादेशच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जाकेक अली याने सर्वाधिक २४ धावा आणि परवेझ हुसैन इमॉन नाबाद 23 धावा केल्या. भारताच्या साई किशोर याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यावर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल एकही धाव न करता माघारी परतला. भारताला सामना कठीण होतो की काय असं वाटत होतं. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने २६ बॉलमध्ये नाबाद ४० धावा आणि तिलक वर्माने नाबाद ५५ धावा केल्या. दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो को पळो करून सोडलं. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
🏏 𝗢𝗡𝗘 𝗠𝗢𝗥𝗘 𝗠𝗘𝗗𝗔𝗟 𝗖𝗢𝗡𝗙𝗜𝗥𝗠𝗘𝗗! Ruturaj & co. defeat Bangladesh with ease to assure India of a 🥇 or a 🥈 in men’s cricket.
🇮🇳 Go for gold, boys!
➡️ Follow @sportwalkmedia for schedule, results, medal and record alerts.@19thAGofficial @Media_SAI… pic.twitter.com/NN7FbDxrqL
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) October 6, 2023
बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसैन इमॉन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, सैफ हसन (C), अफिफ हुसैन, शहादत हुसेन, जाकेर अली (W), रकीबुल हसन, हसन मुराद, मृत्युंजॉय चौधरी, रिपन मंडोल
भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, जितेश शर्मा (ऐ), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग