बिजिंग | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने एशियन गेम्स 2023 स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करत गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर आता टीम इंडिया सुवर्ण पदक जिंकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात गोल्ड मेडलसाठी लढत होणार आहे. हा सामना शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. गुलबदीन नायब याच्याकडे अफगाणिस्तानची सूत्रं आहेत. आता टीम इंडियाकडून क्रिकेट चाहत्यांना गोल्ड मेडलची अपेक्षा आहे.
एशियन गेम्स स्पर्धेत शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी 2 सेमी फायनल मॅचेस झाल्या. पहिल्या सामन्यात टीम इंडिया-बांगलादेश आमनेसामने होते. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला चितपट करत फायनलमध्ये धडक मारली. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं 97 धावांचं माफक आव्हान टीम इंडियाने 10 ओव्हरआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. तिलक वर्मा आणि कॅप्टन ऋतुराज या दोघांनी 97 धावांची विजयी भागीदारी केली.
तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 4 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. अफगाणिस्तानने पाकिस्तानला 115 धावांवर 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. त्यामुळे अफगाणिस्तानला 116 धावांचं आव्हान मिळालं. अफगाणिस्तानने हे आव्हान 13 बॉलआधीच 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
दरम्यान आता टीम इंडिया आणि अफगाणिस्तानने किमान रौप्य पदक निश्चित केलं आहे. मात्र दोन्ही संघाचं लक्ष्य आता सुवर्ण पदक आहे. मात्र एकच टीम अंतिम सामन्यात जिंकेल. त्यामुळे कोणती टीम जिंकून सुवर्ण पदकाला गवणसी घालते हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल.
अफगाणिस्तान टीम | गुलबदीन नायब (कॅप्टन), सेदीकुल्ला अटल, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली झद्रान, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अफसर झझाई, करीम जनात, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान, सय्यद शिरजाद, निजात मसूद, झुबैद अकबरी आणि वफीउल्ला तारखिल.
एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिवम दुबे आणि आकाश दीप.