बिजिंग | एशियन गेम्स वूमन्स टी 20 क्रिकेट फायनलमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 116 धावा केल्या. टीम इंडियाकडून सांगलीकर स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तर जेमिमाह रॉड्र्रिग्स हीने अखेरपर्यंत टिकून राहत श्रीलंकेच्या गोलंदाजाचा सामना केला. जेमिमाह हीने 42 रन्स केल्या. मात्र दुर्देवाने या दोघींव्यतिरिक्त टीम इंडियाकडून एकीलाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दोघींशिवाय इतरांना लंकेसमोर नांग्या टाकल्या.
टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. शफालीकडून मोठ्या आणि वादळी सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र शफाली 9 धावा करुन मैदानाबाहेर परतली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स आली. जेमिमाह आणि स्मृती या दोघींनी तडाखेबंद बॅटिंग केली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी आणि निर्णायक भागीदारी केली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 73 रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी शतकी भागीदारी करेल असं वाटत असतानाच स्मृती आऊट झाली. स्मृतीने 45 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 46 धावा केल्या.
श्रीलंकेला 117 धावांचं आव्हान
Sri Lanka have restricted India to 116/7 in the #AsianGames Women’s T20I Final.
Who will get the Gold? ✨
📝: https://t.co/A3YXwRXvwx pic.twitter.com/SOi9zgTOq9
— ICC (@ICC) September 25, 2023
स्मृतीनंतर एक एक करुन टीम इंडियाच्या रणरागिनी आल्या. मात्र जेमिमाहला एकीनेही धड साथ दिली नाही. रिचा घोष 9, कॅप्टन हरमनप्रीत 2, पूजा वस्त्राकर 2, अमनज्योत कौर 1 रन करुन आऊट झाले. तर जेमिमाहने 40 बॉलमध्ये 5 फोरसह 42 रन्स केल्या. तर दीप्ती शर्मा 1 रनवर नॉट आऊट राहिली. श्रीलंकेकडून प्रबोधिनी, सुंगदिका कुमारी आणि रनविरा या तिघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकार, तीतस साधू आणि राजेश्वरी गायकवाड.
वूमन्स श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विश्मी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, कविशा दिलहारी, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी