मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या निर्णायक असा पाचवा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी मालिका चौथ्या कसोटीतच वाचवली आहे. तर इंग्लंड पुढे कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून इंग्लंडचे खेळाडू खेळताना दिसत आहे. एकही संधी हातून सुटू नये यासाठी प्रयत्नशील आहे. पण बेन स्टोक्स हातून एक चूक घडली आणि स्टीव स्मिथ याला जीवदान मिळालं. खरं हा झेल बेन स्टोक्स याने घेतला होता पण सेलिब्रेशन करण्याच्या नादात हातून चेंडू सुटला, असंच सुरुवातीला वाटलं. त्यामुळे बाद की नाबाद असा प्रश्न उपस्थित झाला.
मोइन अलीच्या गोलंदाजीवर स्टीव स्मिथने डिफेंस केला. पण चेंडू बॅट आणि पॅडला लागून लेग स्लिपला उभ्या असलेल्या बेन स्टोक्सच्या हाती गेला. त्याने एका हाताने झेल घेतला आणि सेलिब्रेशनच्या नादात हातून चेंडू सुटला. पंचांनी स्मिथला नाबाद घोषित केले. पंचांनी पॅडला बॉल लागल्याचं वाटलं असावं आणि त्यांनी नाबाद दिलं असावं असं कर्णधार बेन स्टोक्सला वाटलं. त्यामुळे त्याने डीआरएस घेतला.
डीआरएस घेतल्यानंतर रिप्ले पाहिला गेला. चेंडू स्मिथच्या बॅटला लागून स्टोक्सच्या हाती आल्याचं स्पष्ट झालं. पण थर्ड अंपायर नितीन मेनन यांनी बारकाईने हा झेल पाहिला. इंग्लंडच्या कर्णधाराने हा झेल घेतला होता. पण तो झेल पूर्ण केला नव्हता. कारण चेंडू हातात पकडल्यानंतर मोशनमध्ये खाली येताना पायाला हात लागला आणि चेंडू सुटला. पंचांनी झेल अपूर्ण मानून स्मिथला नाबाद घोषित केलं.
Out or not out? ?♂️ #EnglandCricket| #Ashes pic.twitter.com/q2XCJuUpxM
— England Cricket (@englandcricket) July 31, 2023
स्टीव स्मिथ याला नाबाद घोषित केल्यानंतर ओव्हलमधील प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर या झेल विरोधात रान पेटवलं गेलं. इतकंच काय तर हॅशटॅश नितीन मेनन करून ट्रोल करण्यात येत आहे. पण थर्ड अंपायर नितीन मेनन यांचा निर्णय योग्य होता. आयसीसीच्या नियमानुसार चेंडू पकल्यानंतर शरीराची पोजिशन पूर्ण होणं गरजेची आहे.