भारतीय क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक महिन्यांपासूनची प्रतिक्षा संपली आहे. विराट कोहली याला अखेर सूर गवसला आहे. विराटने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पर्थ स्टेडियममध्ये शतक झळकावलं आहे. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 30 वं तर 81 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं आहे. विराटने या शतकासह दिग्गज सचिन तेंडुलकर याचा शतकांचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच विराटच्या या शतकानंतर कर्णधार जसप्रीत बुमराह याने भारताचा दुसरा डाव हा 134.3 षटकांमध्ये 6 बाद 487 धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर आता 534 धावांचं महाकाय आव्हान आहे.
विराटने 143 बॉलमध्ये 69.93 च्या स्ट्राईक रेटने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचं एकूण नववं तर ऑस्ट्रेलियातील सातवं शतक ठरलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याचा भारतीय फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक 6 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट आता ऑस्ट्रेलियात टीम इंडियाकडून सर्वाधिक कसोटी शतकं करणारा पहिला तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा इंग्लंडच्या जॅक होब्बस (9 शतकं) यांच्या नावावर आहे.
विराट कोहलीचं 30 वं कसोटी शतक
Test Century No.30!
All hail, King Kohli 🫡👏👌
Live – https://t.co/gTqS3UPruo…… #AUSvIND pic.twitter.com/VkPr1YKYoR
— BCCI (@BCCI) November 24, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.