टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाची फलंदाजीदरम्यान ऑन कॅमेरा फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. केएल राहुल याला नॉट आऊट असतानाही आऊट दिल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. तसेच या निर्णयाविरुद्ध सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. टीम इंडियासोबत पंचांनी फसवणूक केल्याचा आरोपही केला जात आहे.
मिचेल स्टार्क याच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाकडून कॅच आऊटसाठी अपील करण्यात आली. फिल्ड अंपायरने केएल राहुल नॉट आऊट असल्याचं जाहीर केलं. केएलच्या बॅटऐवजी बॉल त्याच्या पॅडला लागल्याचं प्रथमदर्शनी वाट होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने फिल्ड अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत रीव्हीव्यू घेतला. या रीव्हीव्यूमध्ये केएलच्या बॅटला बॉल लागल्याचं थर्ड अंपायरच्या निदर्शनास आलं. त्यामुळे फिल्ड अंपायरने त्याचा निर्णय बदलत केएल आऊट असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे केएलला मैदान सोडावं लागलं. केएलनेही या निर्णयाविरुद्ध नाराजी देहबोलीतून नाराजी व्यक्त केली. केएलने 74 चेंडूत 26 धावांची खेळी केली. केएलने या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पाही पार केला.
थर्ड अंपायरने फुटेजद्वारे केएलच्या बॅटला बॉल लागलाय की नाही? हे पाहिलं. मात्र या फुटेजमधून केएलच्या बॅटला बॉल लागलाय की नाही? हे पूर्णपणे स्पष्ट झालं नाही. इतकंच काय तर स्निकोमीटरमधूनही बॉल पॅडला लागलाय की बॅटला? हे ही स्पष्ट होऊ शकलं नाही. साधारणपणे जेव्हा असा पेच निर्माण होतो तेव्हा फलंदाजांच्या बाजूने हा निर्णय जातो आणि त्याला नाबाद दिलं जातं. मात्र इथे उलटच झालं. अंपायरने फुटेजमधून काहीही स्पष्ट दिसत नसतानाही आऊट दिलं.
दुर्देवी केएल राहुल
“His pad and bat are not together at that point in time as the ball passes.
“It’s (bat hitting pad) after, in fact, the ball passes the edge. Does Snicko pick up the sound of the bat hitting the pad?
“We’re assuming (Snicko) may be the outside edge of the bat but that may not… pic.twitter.com/hvG0AF9rdo
— 7Cricket (@7Cricket) November 22, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.