AUS vs IND : यशस्वी जयस्वाल याचं ऐतिहासिक शतक, दिग्गज सचिन तेंडुलकरच्या खास यादीत एन्ट्री

| Updated on: Nov 24, 2024 | 9:59 AM

Yashasvi Jaiswal Century : यशस्वी जयस्वाल याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी विक्रमी शतक केलं आहे. यशस्वीने यासह इतिहास घडवला आहे.

AUS vs IND : यशस्वी जयस्वाल याचं ऐतिहासिक शतक, दिग्गज सचिन तेंडुलकरच्या खास यादीत एन्ट्री
yashasvi jaiswal century aus vs ind 1st test perth
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

पर्थ स्टेडियममध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने इतिहास घडवला आहे. यशस्वीने त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पदार्पणातील सामन्यात मोठा कारनामा केला आहे. यशस्वीने सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात केएल राहुलसोबत द्विशतकी सलामी भागीदारीसह वैयक्तिक शतक झळकावलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. यशस्वीने या शतकासह खास आणि मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

यशस्वीने दुसऱ्या डावातील 62 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर जोश हेझलवूडला सिक्स ठोकत शतक झळकावलं. यशस्वीचं हे या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप साखळीतील चौथं शतक ठरलं. यशस्वी यासह या डब्ल्यूटीसी साखळीत सर्वाधिक शतकं करणारा पहिला भारतीय ठरला. तसेच यशस्वी ऑस्ट्रेलियात शतक करणारा चौथा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्वात कमी वयात ऑस्ट्रेलियात शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियातील युवा भारतीय शतकवीर

सचिन तेंडुलकर – 1992, वय – 18 वर्ष 253 दिवस

ऋषभ पंत – 2019, वय 21 वर्ष 91 दिवस

दत्त फडकर – 1948, वय 22 वर्ष 42 दिवस

यशस्वी जयस्वाल – 2024, वय 22 वर्ष 330 दिवस

द्विशतकी सलामी भागीदारी

दरम्यान टीम इंडियाने पहिल्या डावातील 46 धावांच्या आघाडीसह अप्रतिम सुरुवात केली. यशस्वी आणि केएल राहुल या सलामी जोडीने 201 धावांची भागीदारी केली. यशस्वीने या दरम्यान शतक झळकावलं. केएलकडेही शतकाची संधी होती, मात्र त्याचं शतक हुकलं. यशस्वी 176 बॉलमध्ये 5 फोरसह 77 धावा केल्या.

यशस्वीचा सिक्स आणि ऑस्ट्रेलियातील पहिलं शतक

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवुड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.