बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिला दिवस यजमानांच्या नावावर राहिला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑलआऊट 180 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 33 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दुसऱ्या दिवशी कांगारुंना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्वीनी ही सलामी जोडी मैदानात आली. सलामी जोडीने चिवट सुरुवात केली. मात्र काही जसप्रीत बुमराह याने डावातील 11 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजा याला आऊट करत ओपनिंग जोडी फोडली. ख्वाजा 35 बॉलमध्ये 13 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 24 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॅथन मॅकस्वीनी आणि मानर्स लबुशेन या दोघांनी नाबाद 52 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने 33 ओव्हमध्ये 1 आऊट 86 रन्स केल्या. लबुशेन 67 बॉलमध्ये 3 चौकारांसह 20 रन्सवर नॉट आऊट आहे. तर नॅथन याने 97 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 38 धावा केल्या आहेत.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र मिचेल स्टार्क याने 6 विकेट्स घेत टीम इंडियाचा डाव 180 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. केएल राहुल याने 37, शुबमन गिल 31, आर अश्विन याने 22 तर ऋषभ पंत याने 21 धावांचं योगदान दिलं. यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर विराट कोहली याने 7 तर कॅप्टन रोहितने 3 धावा करुन निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क व्यतिरिक्त पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया 94 धावांनी आघाडीवर
That’s Stumps on Day 1
Australia trail by 94 runs
Live ▶️ https://t.co/upjirQBOtn#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/dxIG23Ap25
— BCCI (@BCCI) December 6, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.