ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवासाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. अॅडलडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या डे नाईट सामन्यात ऑस्ट्रेलियाने घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडिया या सामन्यात अज्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या 157 धावांच्या प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 24 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. तर पंत-नितीश रेड्डी ही जोडी नाबाद परतली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात 87.3 ओव्हरमध्ये 337 धावा केल्या. कांगारुंनी यासह 157 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हेडने 140 धावांची खेळी केली. तर मार्नस लबुशेन याने 64 धावांचं योगदान दिलं. तर भारतीय गोलंदाजांनी इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स मिळवल्या. तर आर अश्विन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्यानंतर दुसर्या डावात बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाचे फलंदाज फुस्स ठरले. कांगारुंनी टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. केएल राहुल 7, यशस्वी जयस्वाल 24, विराट कोहली 11, शुबमन गिल 28 आणि रोहित शर्मा 6 धावा करुन आऊट झाला. तर खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 28 आणि नितीश कुमार रेड्डी 15 धावांवर नाबाद परतले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल स्टार्क याने 1 विकेट घेतली.
आता पंत-रेड्डीवर मदार
That’s Stumps on Day 2#TeamIndia trail by 29 runs with Rishabh Pant and Nitish Kumar Reddy in the middle
Updates ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/ydzKw0TvkN
— BCCI (@BCCI) December 7, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.