टीम इंडियासाठी कायम डोकेदुखी असलेला ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड याने पुन्हा एकदा रोहितसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाविरुद्ध ॲडलेडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शतकी खेळी केली आहे. हेडने वनडे स्टाईल हे शतक केलं. हेडच्या या शतकासह ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहचली आहे. टीम इंडियाला या सामन्यात कायम रहायचं असल्यास आणि ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखायचं असेल, तर कोणत्याही स्थितीत विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
ट्रेव्हिस हेड याच्या कसोटी कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. हेडने 111 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 90.09 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. हेडने शतक पूर्ण करताच आपल्या कुटुंबियाकडे बघून शतकी जल्लोष केला. हेड आणि त्याच्या पत्नीला नुकतंच पुत्ररत्न लाभलं. हेडची पत्नी स्टेडियममध्ये मुलासह उपस्थित होती. हेडने शतक ठोकल्यानंतर हाताचा झुला करुन आपल्या पत्नी आणि मुलाकडे पाहिलं आणि शतक साजरं केलं.
ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाविरुद्ध अनेकदा निर्णायक गेमचेंजिग खेळी केली आहे. हेडने आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल या दोन्ही सामन्यांमध्ये शतक ठोकलं होतं. हेडच्या या शतकामुळे भारताला दोन्ही आयसीसी ट्रॉफीपासून वंचित रहावं लागलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हेडने शतक ठोकत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलंय.
ट्रेव्हिक हेडचं खास सेलिब्रेशन
That’s for baby Harrison!
Another home-town ton for Travis Head! #AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/u4s6nV62RZ
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.