AUS vs IND : चल निघ, सिराजकडून हेडचा करेक्ट कार्यक्रम, आऊट झाल्यानंतर दोघेही भिडले, पाहा व्हीडिओ

| Updated on: Dec 07, 2024 | 3:37 PM

Mohammed Siraj and Travis Head Heated Exchange Video : मैदानात कायम आक्रमक असणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेडचा काटा काढला आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

AUS vs IND : चल निघ, सिराजकडून हेडचा करेक्ट कार्यक्रम, आऊट झाल्यानंतर दोघेही भिडले, पाहा व्हीडिओ
mohammed Siraj dismissed to travis head
Follow us on

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी मोठी डोकेदुखी दूर केली. सिराजने टीम इंडियासाठी धोकादायक ठरत असलेल्या ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यॉर्करवर बोल्ड केल्यानंतर सिराजने हेडला चल निघ असा हाताने रागात इशारा केला आणि जल्लोष केला. मात्र आऊट झाल्याने हेडनेही सिराजला सुनावण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांमधील शर्यतीत सिराजने बाजी मारली. या दोघांमध्ये भरमैदानात झालेल्या या राड्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेड-सिराजमध्ये राडा

हेडने खऱ्या अर्थाने टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. हेड मैदानात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे आघाडी नव्हती. मात्र हेडने कसोटीत वनडे स्टाईल फटकेबाजी केली. हेडने अवघ्या 63 बॉलमध्ये फिफ्टी केली. त्यानंतर हेडने गिअर बदलला. हेडने चौफेर फटकेबाजीसह टीम इंडियाला पूर्णपणे चितपट केलं. हेडने मिळेल तिथे फटके मारले आणि फक्त 111 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. हेडच्या कसोटी कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. हेडच्या शतकासह ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा हेडला आऊट करण्यासाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या मदतीसह शक्य तितके प्रयत्न करत होता. मात्र हेडने त्याचा दांडपट्टा सुरुच ठेवला होता.

हेड शतकानतंर आणखी बेछूट बॅटिंग करत होता. हेडमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू लागल्या होत्या. हेड आता 150 धावांपर्यंत पोहचतो असं वाटत असतानाच ज्या क्षणाची सर्वांना प्रतिक्षा होती तो क्षण आला. टीम इंडियाचा डीएसपी अर्थात मोहम्मद सिराज याने हेडला यॉर्कर टाकत बोल्ड केलं. सिराजने बोल्ड केल्यांनतर हेडला चल निघ असं इशाऱ्याने म्हणत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे चिडलेल्या हेडनेही सिराजला प्रत्युत्तर दिलं. हेडने 141 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 17 फोरसह 140 रन्स केल्या.

ट्रेव्हिस हेडचा करेक्ट कार्यक्रम

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.