AUS vs IND : इंडिया-ऑस्ट्रेलिया गाबा टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, या 11 खेळाडूंचा समावेश, कुणाला डच्चू?

| Updated on: Dec 13, 2024 | 4:25 PM

AUS vs IND 3rd Test Playing Eleven : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारी 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सध्या ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.

AUS vs IND : इंडिया-ऑस्ट्रेलिया गाबा टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, या 11 खेळाडूंचा समावेश, कुणाला डच्चू?
yashasvi jaiswal and mitchell starc aus vs ind
Image Credit source: Icc X account
Follow us on

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. ही 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने या तिसऱ्या सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने कुणाला संधी दिलीय आणि कुणाला डच्चू दिलाय? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही फक्त एकच बदल केला आहे. टीममध्ये जोश हेझलवूड याचं कमबॅक झालं आहे. हेझलवूड पहिल्या सामन्यात खेळला होता. मात्र दुसर्‍या सामन्यात त्याला दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. त्यामुळे हेझलवूड याच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँड याला संधी देण्यात आली होती. मात्र आता हेझलवूडच्या कमबॅकनंतर आता बोलँडला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बोलँडने दुसऱ्या कसोटीत एकूण 5 विकेट्स घेतल्या होत्या. बोलँडने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडियातून कुणाला डच्चू?

दरम्यान दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये किती बदल होणार? कुणाला डच्चू मिळणार? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. माहितीनुसार, टीम इंडियात 2 ते 3 बदल होऊ शकतात. आता टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनमबाबत काय निर्णय घेते? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.