टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू आर अश्विन याने 18 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विन निवृत्तीआधी सामन्यादरम्यान भावूक झालेला दिसला. अश्विन ड्रेसिंग रुममध्ये सहकारी विराट कोहली याच्यासोबत बोलताना दिसला. अश्विन आणि विराट या दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. अश्विनला या दरम्यान अश्रू अनावर झाले होते. अश्विन त्यानंतर हेड कोच आणि माजी सहकारी गौतम गंभीर याच्यासोबत बोलताना दिसला. अश्विन आणि गंभीर या दोघांचा संवाद सुरु असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमुळे दोघांमध्ये काही तरी खटके उडाल्याचं म्हटलं जात आहे.
व्हायलर फोटोत गौतम गंभीर एका खुर्चीत बसलेला आहे. तर अश्विन गंभीरसोबत उभ्याने बोलतोय. या संवादाचा फोटो पाहून दोघांमध्ये काही खटके उडाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच गंभीर अश्विनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं? याबाबत अजूनही अस्पष्टताच आहे.
अश्विनने निवृत्तीनंतर टीम इंडियातील सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानले. अश्विनने रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या चौघांचं नाव घेत आभार व्यक्त केले. या चौघांनी कॅच घेऊन मला विकेट्स मिळवून दिल्या असं अश्विनने म्हटलं.
दरम्यान अश्विन टीम इंडियासाठी सर्वाधिक विके्टस घेणारा दुसरा फिरकीपटू होता. अश्विनने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 537 विकेट्स घेतल्या. तर अनिल कुंबळे याच्या नावावर सर्वाधिक 619 विकेट्सची नोंद आहे.
ड्रेसिंग रुममध्ये काय झालं?
#INDvAUS #INDvsAUS #GautamGambhir #Ashwin
Was there an argument going on between Ravichandran Ashwin and Gautam Gambhir ? Ash Anna was pointing finger while talking & body language didn’t look good, even Gambhir’s response was not well.
Feeling Forced for Retirement ? pic.twitter.com/e5fMYdBt8q
— g0v!ñD $#@®mA (@rishu_1809) December 18, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.