भारतीय क्रिकेट चाहते ब्रिस्बेनमधील गेले 2 कसोटी सामने कधीच विसरणार नाहीत. ऋषभ पंत याने टीम इंडियाला 2021 साली ऐतिहासिक विजय मिळवून देत ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला होता. त्यानंतर 18 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेलील तिसरा सामना अनिर्णित राहिला त्यानंतर आर अश्विन याने एकाएकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनने पत्रकार परिषदेतून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अश्विनच्या या अशा निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला. अश्विनने निवृत्ती घेतलीय, यावर अजूनही क्रिकेट चाहत्यांचा विश्वास बसत नाहीय. अश्विनच्या या निर्णयामुळे भारतासाठी कसोटीत 500 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला औपचारिकरित्या निरोपही देता आला नाही. अश्विनच्या निवृत्तीनंतर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अश्विनने मालिकेदरम्यानच निवृत्ती का घेतली? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अश्विनने त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
अश्विनला पर्थमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची इच्छा होती. मात्र अश्विनला वगळून वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावरुन अश्विनचं माझ्यासोबत निवृत्तीबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं. अश्विननेही या दरम्यान कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्ट म्हटलं. जर सीरिजमध्ये माझी गरज नसेल तर मी निवृत्तीचा निर्णय घेतलेलाच बरा, असं अश्विनने या दरम्यान म्हटलं.
🗣️ “I’ve had a lot of fun and created a lot of memories.”
All-rounder R Ashwin reflects after bringing the curtain down on a glorious career 👌👌#TeamIndia | #ThankYouAshwin | @ashwinravi99 pic.twitter.com/dguzbaousg
— BCCI (@BCCI) December 18, 2024
अश्विनने वयाच्या 38 वर्षी निवृत्ती घेतली. अश्विनने वयामुळे निवृत्ती घेतल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. मात्र अश्विनने पत्रकार परिषदेत वयाचा उल्लेखही केला नाही. “क्रिकेटपटू म्हणून माझ्यात खेळायची आणखी क्षमता आहे. माझ्यात क्रिकेटची आणखी भूक आहे. मी देशांतर्गत आणि क्लब लेव्हलवर क्रिकेट खेळत राहिन.मात्र माझ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा दिवस आहे”, असं अश्विनने पत्रकार परिषदेत म्हटलं.
दरम्यान अश्विनने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 106 सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अनुभवी फिरकीपटूच्या नावावर 65 टी 20i सामन्यांमध्ये 72 विकेट्सची नोंद आहे.