टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सामन्यात 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. पर्थ कसोटीतील विजयी सुरुवातीनंतर टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियाला अॅडलेडमध्ये सलग दुसरा विजय मिळवून मालिकेवर घट्ट पकड मिळवण्याची संधी होती. मात्र यजमानांनी कमबॅक केल आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्यात यश मिळवलं. टीम इंडियाच्या काही जणांचा अपवाद वगळता बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांच्या कमबॅकमुळे दुसऱ्या कसोटीत 2 बदल केले गेले. तर वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी आर अश्विन याचा समावेश करण्यात आला. अशाप्रकारे 3 बदल केले गेल. मात्र हे बदल फार निर्णायक ठरले नाहीत. त्यामुळे कॅप्टन रोहित आता एक्शन मोडमध्ये आला आहे. रोहित तिसऱ्या सामन्यासाठी किमान 2 बदल करणार असल्याचं निश्चित आहे.
उभयसंघातील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हनमधून आर अश्विन आणि हर्षित राणा या दोघांचा पत्ता कट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी दुसऱ्या कसोटीत निराशा केली. राणाने दुसऱ्या कसोटीत 16 षटकांत 86 धावा दिल्या. राणाला एकही विकेट घेता आली नाही. तर अश्विनला बॉलिंगने काही खास करता आलं नाही. अश्विनला फक्त 1 विकेटच घेता आली. तर अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 22 आणि 7 धावा केल्या.
हर्षित आणि अश्विन या दोघांच्या जागी आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी दिली जाऊ शकते. आकाशने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर वॉशिंग्टन बॉलिंगसह बॅटिंगही करतो.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश रेड्डी, वाशिंगटन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.