AUS vs IND : टीम इंडियाने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 बदल, बॅटिंग की फिल्डिंग?

| Updated on: Dec 14, 2024 | 6:16 AM

India vs Australia 3rd Test Toss : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. पाहा प्लेइंग इलेव्हनमधून कुणाला डच्चू देण्यात आला.

AUS vs IND : टीम इंडियाने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 बदल, बॅटिंग की फिल्डिंग?
AUS vs IND 3rd Test Toss Gabba
Follow us on

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 20 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रोहित शर्माने फिल्डिंगचा निर्णय करत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 बदल केलाय. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून आघाडी घेतं, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

कुणाला डच्चू?

कॅप्टन रोहित आणि टीम मॅनेजमेंटने टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधून आर अश्विन आणि हर्षित राणा या दोघांना बाहेर केलं आहे. अश्विनच्या जागी रविंद्र जडेजा याचा समावेश करण्यात आला आहे. तर हर्षित राणा याच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाने एकदिवसआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली होती. ऑस्ट्रेलियाने एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त जोश हेझलवूड याचं कमबॅक झालं आहे. तर स्कॉट बोलँड याला बाहेर बसवण्यात आलं आहे.

टीम इंडियाची ब्रिस्बेनमधील कामगिरी

टीम इंडियाने द गाबा, ब्रिस्बेनमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी फक्त 1 सामन्यातच विजयी होता आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा भारतावर मात करत विजय मिळवलाय. तर 1 सामना हा बरोबरीत राहिला आहे.

दोघांचा डच्चू

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.