ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेला सामना पावसाने जिंकला. पाचव्या दिवशी पावसाने खोडा घातल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे 5 सामन्यांची मालिका 1-1 बरोबरीत आहे. आता या मालिकेतील चौथा आणि निर्णायक सामना हा मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. त्या सामन्याआधी विस्फोटक फलंदाजाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे . ट्रेव्हिस हेड याला तिसऱ्या सामन्यात ग्रोईन इंजरीचा त्रास जाणवत होता. अशात आता हेड चौथ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. स्वत: हेडनेच चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबतची माहिती दिली आहे.
ट्रेव्हिस हेडने चौथ्या सामन्याला मुकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. “मी मेलबर्न कसोटीआधी फिट होईल”, असा विश्वास हेडने व्यक्त केला. हेडने तिसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. त्यासाठी हेडला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर हेडने खेळीबाबत प्रतिक्रिया देत दुखापतीबाबत माहिती दिली. “मी माझ्या बॅटिंगमुळे आनंदी आहे. तसेच साधारण सूज आहे. मात्र पुढील सामन्यापर्यंत सूज बरी होईल”, असं हेडने स्पष्ट केलं.
दरम्यान टीम इंडियासाठी कायम डोकेदुखी ठरणाऱ्या हेडने या मालिकेतही टेन्शन वाढवलं आहे. हेडने या मालिकेत आतापर्यंत 81.80 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. हेडने टीम इंडिया विरुद्ध सलग 2 शतकं ठोकली आहेत. त्यामुळे या हेडला चौथ्या कसोटीत रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
ट्रेव्हिस हेडच्या दुखापतीबाबत अपडेट
Travis Head provides an update on his groin injury recovery!
(cricket, cricket updates, Travis Head, Head, INDvAUS, Test Cricket, Cricketmoodofficial) pic.twitter.com/g7IeApLeA7
— cricketmoodofficial (@cricketmoodcom) December 18, 2024
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.