AUS vs IND : चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये, कोण घेणार आघाडी?

| Updated on: Dec 24, 2024 | 11:47 PM

Australia vs India 4th Test : उभयसंघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरी आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये होणारा चौथा सामना हा चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

AUS vs IND : चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये, कोण घेणार आघाडी?
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही 5 सामन्यांची मालिका 3 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. आता चौथा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचा हा चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत टीम इंडियासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये रंगत पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

अशी आहे आकडेवारी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने मेलबर्नमध्ये एकूण 116 कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 67 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला 32 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर 17 सामने हे अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने इथेच 2010 पासून 14 कसोटी सामने खेळलेत, त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवलाय. कांगारुंना 3 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 2 सामने अनिर्णित राहिले.

ऑस्ट्रेलियाला मेलबर्नमध्ये गेल्या 14 वर्षांमध्ये 3 वेळा पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियानेच 3 पैकी 2 वेळा ऑस्ट्रेलियाला लोळवलंय. टीम इंडियाने 2018 आणि 2020 साली विजय मिळवला होता. तर त्याआधी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाला डाव आणि 157 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडियाची मेलबर्नमधील गेल्या काही वर्षांमधील आकडेवारीही सरस राहिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चौथ्या कसोटीत पैसावसूल मॅच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), तनुष कोटीयन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.