बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यातील पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून फलंदाजाची निर्णय घेतला. मात्र अपवाद वगळता बहुतेक फलंदाज हे अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव हा 185 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने दिवसातील शेवटच्या बॉलवर उस्मान ख्वाजाला आऊट करत कांगारुंना पहिला झटका दिला. तर सॅम कॉनस्टास नाबाद परतला आहे. दुसऱ्या दिवशी कॉनस्टाससोबत मार्नस लबुशेन खेळायला येईल.
पहिल्या दिवशी सामन्याला पहाटे 5 वाजता सुरुवात झाली. मात्र आता उर्वरित 4 दिवसांमध्ये खेळाला पहाटे आणखी लवकर सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 4 वाजून 55 मिनिटांनी सुरुवात होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाला ही मालिका बरोबरीत राखण्यासाठी या अंतिम सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवणं बंधनकारक आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना प्रचंड महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालावर टीम इंडियाचं सर्व भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांकडून आशा
Stumps on Day 1 in Sydney!
Captain Jasprit Bumrah with the opening wicket for #TeamIndia 🙌
Australia 9/1, trail by 176 runs.
Scorecard – https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/Z3tFKsqwM2
— BCCI (@BCCI) January 3, 2025
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.