AUS vs IND : नववर्षातील पहिल्याच सामन्यातून स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Jan 02, 2025 | 2:34 PM

Aus vs IND 5th Test : पाचव्या आण अंतिम सामन्यातून स्टार खेळाडूला वगळण्यात आलं आहे. त्याजागी युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

AUS vs IND : नववर्षातील पहिल्याच सामन्यातून स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
virat kohli pat cummins and steven smith
Image Credit source: Icc X Account
Follow us on

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 4 सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये दुसरा विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. त्यामुळे आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. पाचवा सामना हा सिडनी येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाने नववर्षातील पहिल्याच आणि या मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. कॅप्टन पॅट कमिन्स याने ऑलराउंडर मिचेल मार्श याला डच्चू दिला आहे. तर ब्यू वेबस्टर याला पदार्पणाची संधी दिली आहे. मार्शने या मालिकेतील 4 सामन्यात 10.43 च्या सरासरीने 73 धावा केल्या. तर 6 डावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. मार्श टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरला. तसेच भारतीय फलंदाजांसमोर त्याला बॉलिंगने काही करता न आल्याने मिचेलचा पत्ता कट करण्यात आला आहे.

ब्यू वेबस्टर पदार्पणासाठी सज्ज

मार्शच्या जागी संधी मिळालेला ब्यू वेबस्टर हा पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. साडे सहा फुट उंच वेबस्टरने आतापर्यंत 93 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 37.83 च्या सरासरीने 5 हजार 297 धावा केल्या आहेत. वेबस्टरने या दरम्यान 12 शतकं आणि 24 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच वेबस्टरने 148 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे वेबस्टर टीम इंडियाविरुद्ध किती प्रभावी ठरतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

मिचेल मार्शचा पत्ता कट

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलैंड

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.