ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलिया खेळ संपेपर्यंत 176 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात 9 धावा केल्या आहेत. तर कर्णधार जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला दिवसातील शेवटच्या बॉलवर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट करत ऑस्ट्रेलिया पहिला झटका दिला. उस्मान ख्वाजा 10 बॉलमध्ये 2 रन्स करुन आऊट झाला. यासह पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. सॅम कॉन्स्टास 7 धावांवर नाबाद परतला आहे.
टीम इंडियाचा डाव 185 धावांवर आटोपल्यानंतर सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा सलामी जोडी मैदानात आली. दिवसाचा खेळ संपायला अवघे काही मिनिटं बाकी होती. त्यामुळे टीम इंडियाचा जास्तीत जास्त ओव्हर टाकून विकेट घेण्याचा प्रयत्न होता. मात्र उस्मानच्या हाताला बॉल लागल्याने आधीच काही मिनिटं वाया गेली. बुमराह ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसरी ओव्हर टाकायला आला. ख्वाजाने पुन्हा काही वेळ घेतला. त्यामुळे बॉल टाकायला तयार झालेल्या बुमराहने नाराजी व्यक्त केली. आता यात नॉन स्ट्राईक एंडला असलेल्या सॅमने उडी घेत बुमराहला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर बुमराहने तो काय दर्जाचा बॉलर आहे हे दाखवून दिलं. बुमराहने पुढच्याच बॉलवर उस्मान ख्वाजाला स्लीपमध्ये केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं.
उस्मान ख्वाजा आऊट होताच बुमराहसह टीम इंडियाने एकच जल्लोष केला. बुमराहने नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या सॅमला त्याच्याच पद्धतीने उत्तर दिलं. तर स्लीपमध्ये असलेल्या विराटने सॅमसमोर एकच जल्लोष केला. या साऱ्या जल्लोषाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बुमराहचा नादच नाय
JASPRIT BUMRAH IS HEATING. 🙇
– Box office stuff in Border Gavaskar Trophy. pic.twitter.com/WrbIyme7WZ
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2025
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.