टीम इंडियाचा विस्फोटक विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात धमाका केला आहे. पंतने सामन्यातील तिसऱ्या आणि टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात विस्फोटक खेळी करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. पंतने कसोटीत टी 20I स्टाईल खेळी करत कांगारुंच्या गोलंदाजांना झोडून काढला. पंतने या अर्धशतकी खेळी दरम्यान मैदानात जोरदार फटकेबाजी केली. पंतच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 100 पेक्षा अधिक धावांची झटपट आघाडी घेता आली. तसेच पंतने या अर्धशतकासह तिघांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
ऋषभ पंतने 22 व्या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर मिचेल स्टार्कला सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या कसोटी कारकीर्दीतील हे 15 वं अर्धशतक ठरलं. तसेच पंतचं हे या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. पंतने अवघ्या 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 186.21 च्या स्ट्राईक रेटने ही फिफ्टी केली. पंत यासह टीम इंडियाकडून कसोटीत वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. टीम इंडियासाठी वेगवान अर्धशतकाचा विक्रमही पंतच्याच नावे आहे. सोबतच पंत ऑस्ट्रेलियात वेगवान अर्धशतक करणारा पहिला पाहुणा फलंदाज ठरला आहे.
ऋषभ पंतची स्फोटक खेळी
🚨 RISHABH PANT SHOW 🚨 pic.twitter.com/5FxsnjeWDa
— Johns. (@CricCrazyJohns) January 4, 2025
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.