बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत खेळवण्यात येत असलेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यातून टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतली आहे. रोहित या मालिकेतील सलामीच्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे खेळू शकला नाही. रोहित त्यानंतरच्या तिन्ही सामन्यात खेळला. मात्र रोहित फलंदाज आणि कर्णधार म्हणून अपयशी ठरला. भारताला रोहितच्या नेतृत्वात 3 पैकी 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर एक सामना पावसाच्या मदतीने अनिर्णित राहिला. तसेच रोहित तिन्ही सामन्यात बॅटिंगनेही अपयशी ठरला. त्यामुळे रोहितने विश्रांती घेण्याचा निर्णय केला. मात्र रोहितचा हा निर्णय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा रंगलीय. त्यावरुन रोहितने संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
रोहितने पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर स्टार स्पोर्ट्सला मुलाखत दिली. रोहितने या मुलाखतीत सर्वच बोलून दाखवलं. तसेच रोहितने त्याच्या निवृत्तीच्या वृत्तांवरुनही माध्यमांवर आगपाखड केली. रोहितने नक्की काय म्हटलं? जाणून घेऊयात.
रोहित निवृत्तीच्या वृत्तांवरुन जाहीर नाराजी व्यक्त करत संतापला. “कुणीतरी एक जण आतममध्ये माईक, लॅपटॉप किंव पेन घेऊन बसलाय. तो काय लिहितो आणि बोलता त्याने आमचं आयुष्य बदलत नाही, ठिकाय. आम्ही इतक्या वर्षांपासून हा खेळ खेळतोय. त्यामुळे आम्ही कधी खेळावं? कधी निवृत्त व्हावं, कधी बाहेर बसावं? आणि कधी नेतृत्व करावं? याबाबत हे ठरवू शकत नाहीत. मी संयमी आणि परिपक्व आहे. मी 2 मुलांचा बाप आहे. माझ्याकडे डोकं आहे, मला आयुष्यात काय हवंय हे माहित आहे”, असं रोहितने म्हटलं.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.