AUS vs IND : पाचव्या सामन्यासाठीही झोपमोड, किती वाजता सुरुवात होणार?

| Updated on: Jan 02, 2025 | 8:32 PM

Australia vs India 5th test Live Streaming : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घ्या सिडनी टेस्ट मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

AUS vs IND : पाचव्या सामन्यासाठीही झोपमोड, किती वाजता सुरुवात होणार?
mohammed Siraj ind vs aus test series
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 2025 वर्षातील पहिला आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचवा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ही मालिका गमावणार नाही, हे निश्चित झालं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडे पाचव्या सामन्यात विजय आणि ड्रॉ असे दोन्ही पर्याय आहेत. मात्र टीम इंडियाला मालिका गमवायची नसेल, तर हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पाचव्या सामन्यासाठीही झोपमोड करावी लागणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना हा 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचव्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा कसोटी सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.