टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 14 डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्या खांद्यावर ऑस्ट्रेलिया संघाची धुरा आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांचे निकाल लागले आहेत. सलामीच्या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने विजयी सुरुवात करत आघाडी घेतली. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत पहिल्या पराभवाचा वचपा घेतला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना बरोबरीत सुटणार? टीम इंडिया जिंकणार की ऑस्ट्रेलिया सलग दुसरा विजय मिळवत मालिकेत आघाडी घेणार? याकडे साऱ्यांची करडी नजर असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत एकूण 109 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 33 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 46 सामने जिंकलेत. तर 29 सामने हे बरोबरीत सुटले आहेत. तर टीम इंडियाने गाबात खेळलेल्या 7 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. भारताला ऑस्ट्रेलियाने 5 वेळा पराभूत केलंय. तर 1 सामना हा बरोबरीत राहिला आहे.
टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज, रोहितसेनेचा जोरदार सराव
Preps ✅#TeamIndia is Brisbane 𝙍𝙀𝘼𝘿𝙔! 🙌 🙌#AUSvIND pic.twitter.com/X2QfFGhwqq
— BCCI (@BCCI) December 13, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.