AUS vs IND: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया सामन्यानंतर दिग्गज फलंदाज निवृत्त!

| Updated on: Jun 25, 2024 | 1:38 PM

India vs Australia T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया सामन्यानंतर दिग्गज फलंदाजाने निवृत्त झाला आहे. कोण आहे तो?

AUS vs IND: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया सामन्यानंतर दिग्गज फलंदाज निवृत्त!
david warner and virat kohli
Image Credit source: BCCI
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत अफगाणिस्तानने बांगलादेशवर डीएलएसनुसार 8 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली. अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी आणि अंतिम टीम ठरली. अफगाणिस्तानच्या विजयासह बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचंही पॅकअप झालंय. सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया विरुद्ध पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं भवितव्य हे अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून होतं. बांगलादेश जिंकला असता, तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहचली असती. मात्र अफगाणिस्तानने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा यासह परतीचा प्रवास निश्चित झाला. तसेच यासह दिग्गज खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्त झाला आहे. वॉर्नरने याआधीच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपनंतर टी 20I फॉर्मेटला रामराम करणार असल्याचं वॉर्नरने म्हटलं होतं. आता ऑस्ट्रेलियाचं सुपर 8 मधून पॅक अप झाल्याने वॉर्नरचा टीम इंडिया विरुद्धचा टी 20 सामना हा अखेरचा ठरला. वॉर्नरने अखेरच्या सामन्यात 6 धावा केल्या. वॉर्नरने निवृत्तीबाबत अधिकृतरित्या सोशल मीडियाद्वारे घोषणा केलेली नाही. मात्र त्याने याआधीच याबाबत जाहीररित्या म्हटलं होतं.

डेव्हिड वॉर्नर याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दरम्यान डेव्हिड वॉर्नर याने ऑस्ट्रेलियाचं 112 कसोटी, 161 वनडे आणि 110 टी 20I सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. वॉर्नरने क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारात अनुक्रमे 8 हजार 786, 6 हजार 932 आणि 3 हजार 277 अशा धावा केल्या आहेत. वॉर्नरने टेस्टमध्ये 26, वनडेमध्ये 22 आणि टी 20मध्ये 1 शतकंही ठोकले आहेत.

डेव्हिड वॉर्नर निवृत्त!

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.