लंडन | शार्दुल ठाकुर याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना हा लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या शार्दुल ठाकुर याने ओव्हलमध्ये धमाका केलाय. शार्दुलने या महाअंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केलीय. शार्दुल ठाकुरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात बॅटिंग करताना झुंजार अर्धशतक ठोकलं.
शार्दुलने या अर्धशतकासह ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेण्यापासून रोखलं. शार्दुलने या अर्धशतकासह विक्रम केलाय. शार्दुलने चौकार ठोकत अर्धशतक ठोकलं. शार्दुलने यासाठी 103 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलचं हे कसोटी कारकीर्दीतील एकूण चौथं तर ओव्हलमधील सलग तिसरं अर्धशतक ठरलं.
शार्दुल ठाकुर याचं अर्धशतक
FIFTY!
A gritty and important half-century by @imShard here at the Oval ??
His 4th in Test cricket.
Live – https://t.co/0nYl21oYkY… #WTC23 pic.twitter.com/dsk4T0muap
— BCCI (@BCCI) June 9, 2023
दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. टीम इंडियाची या धावांचा पाठलगा करताना घसरगुंडी झाली. टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज झटपट आऊट झाले. त्यांनतर रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी फुटली. जडेजा आऊट झाला. त्यानंतर केएस भरत मैदानात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. केएस भरत दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला.
त्यानंतर रहाणेची साथ द्यायला शार्दुल ठाकुर मैदानात आला. शार्दुलने रहाणेला चांगली साथ दिली.अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची निर्णायक आणि शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 296 धावांपर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.