AUS vs IND : सलग दुसऱ्यांदा पावसाचा खोडा, पहिल्या सत्रावर ‘पाणी’, टीम इंडियाला टेन्शन

| Updated on: Dec 14, 2024 | 9:09 AM

AUS vs IND 3rd Test Rain : द गाबा, ब्रिस्बेन येथे पावसाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना थांबवून स्वत:ची बॅटिंग सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियाने खेळ थांबला तोवर 13.2 ओव्हरमध्ये बिनबाद 28 धावा केल्या आहेत.

AUS vs IND : सलग दुसऱ्यांदा पावसाचा खोडा, पहिल्या सत्रावर पाणी, टीम इंडियाला टेन्शन
AUS vs IND 3rd Test Rain
Follow us on

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रातील बहुतांश खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. पावसाने पहिल्या सत्रात सलग दुसऱ्यांदा व्यत्यय आणल्यानंतर खेळ थांबवण्यात आला. तर त्यानंतर काही मिनिटांनी लंच ब्रेक झाला. कसोटी सामन्यात एका दिवसात 90 षटकांचा खेळ अपेक्षित असतो. त्यानुसार 3 सत्रात या 90 ओव्हरचा खेळ होणं अपेक्षित असंत. मात्र या सामन्यातील पहिल्या सत्रात फक्त 13.2 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने बिनबाद 28 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा 19 तर नॅथन मॅकस्वीनी 4 धावांवर नाबाद आहे.

भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी टॉस झाला. भारताने फिल्डिंगचा निर्णय घेत कांगारुंना बॅटिंगसाठी भाग पाडलं. सामन्याला 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. मात्र सहाव्या षटकात पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि खेळाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पुन्हा सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी वरुणराजाने कमबॅक केलं. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर बीसीसीआयने 8 वाजून 13 मिनिटांनी लंच ब्रेक झाल्याची माहिती दिली.

पाऊस सुरुच

दरम्यान ब्रिस्बेनमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील खेळही या पावसामुळे प्रभावित होऊ शकतो. आता हा पाऊस किती वेळ बॅटिंग करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाला टेन्शन!

दरम्यान टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 3-1 किंवा 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी या मालिकेतील प्रत्येक बॉल अन् बॉल महत्त्वाचा आहे. अशात दुसऱ्या सत्राआधी खेळाला सुरुवात न झाल्यास टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं.

ब्रिस्बेनमध्ये पावसाची बॅटिंग

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.