AUS vs IND : ऑस्ट्रेलिया-इंडिया दुसऱ्या कसोटीत कर्णधार बदलणार, हा दिग्गज करणार नेतृत्व

| Updated on: Nov 26, 2024 | 3:39 PM

AUS vs IND 2nd Test Captaincy : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 6 ते 10 डिसेंबरदरम्यान एडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया-इंडिया दुसऱ्या कसोटीत कर्णधार बदलणार, हा दिग्गज करणार नेतृत्व
rohit sharma and virat kohli test cricket
Image Credit source: Bcci
Follow us on

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीत एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात केलीय. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने कांगारुंचा पर्थमध्ये धुव्वा उडवला. भारताने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाला 534 धावंचं आव्हान देत 238 वर गुंडाळलं. टीम इंडियाने यासह हा सामना 295 धावांच्या फरकाने जिंकला. टीम इंडियाने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय मिळवला. बुमहाने नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहित शर्मा दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे उपकर्णधार या नात्याने बुमराहला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. बुमराह कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात पहिल्याच कसोटी सामन्यात टीम इंडियाला जिंकवणारा अजिंक्य रहाणे याच्यानंतर पहिलाच कर्णधार ठरला. मात्र आता दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे.

रोहित ऑस्ट्रेलियात

रोहित शर्मा काही दिवस कुटुंबासह वेळ घालवल्यानंतर पहिल्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि टीम इंडियासह जोडला गेला. इतकंच नाही, तर रोहितने ऑस्ट्रेलियात पोहचताच सरावालाही सुरुवात केली.

रोहितसमोर आव्हान काय?

रोहितच्या नेतृत्वात भारताला न्यूझीडंविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची मालिका 3-0 ने गमवावी लागली. मात्र बुमराहने टीम इंडियाला विजय मिळवून देत ट्रॅकवर आणलं आहे. तसेच टीम इंडियाा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी ही मालिका 4-1 ने जिंकायची आहे. अशात रोहितसमोर टीम इंडियाची या मालिकेतील विजयी घोडदौड अशीच कायम राखण्याच आव्हान असणार आहे. रोहित कर्णधार म्हणून हे आव्हान कसं पेलतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.