आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅप्टन रोहित शर्मासह इतर फलंदाजांनी केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. टीम इंडियासाठी कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या त्रिकुटाने चांगली फलंदाजी केली. तसेच ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनीही योगदान दिलं.
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात राहिली. टीम इंडियाच्या 6 धावा असताना विराट कोहली 0वर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन रोहितने आपला तडाखा दाखवला. रोहितने जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली आणि आपल्याला हिटमॅन का म्हणतात हे कांगारुंना दाखवून दिलं. रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि फक्त 19 बॉलमध्य अर्धशतक झळकावलं. रोहितच्या टी 20आय कारकीर्दीतील हे सर्वात वेगवान फिफ्टी ठरली. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतही संधी मिळेल तसे फटके मारत होता. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरत असताना मार्क्स स्टोयनिसने पंतची शिकार केली. पंतला 15 धावांवर आऊट केलं. रोहित आणि पंतने दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. रोहितने सूर्यासह फटकेबाजी केली. रोहितला वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक ठोकण्याची संधी होती. मात्र रोहित नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. रोहित 41 बॉलमध्ये 7 चौकार आणि 8 सिक्ससह 90 धावांवर बोल्ड झाला. मिचेल स्टार्कने रोहितला आऊट केलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली.
सूर्यकुमार यादव याने 31 आणि शिवम दुबेने 28 धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा ही जोडी नाबाद परतली. हार्दिकने 27 आणि जडेजाने 9 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क आणि मार्क्स स्टोयनिस या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूडने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.