ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 157 धावांच्या प्रत्युत्तरात 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजून 29 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी तिसरा अर्थात रविवार 8 डिसेंबर हा दिवस निर्णायक असणार आहे. तर दुसर्या बाजूला वूमन्स टीम इंडियासाठी 8 डिसेंबरला होणारा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका आयसीसी चॅम्पियनशीप अंतर्गत खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर ताहलिया मॅकग्रा हीच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
दुसर्या सामन्याला पहिल्या सामन्याच्या तुलनेत फारआधी सुरुवात होणार आहे. उभयसंघातील दुसरा सामनाही अॅलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन येथेच होणार आहे. पहिल्या सामन्याला सकाळी भारतीय वेळेनुसार 9 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात झाली होती. मात्र दुसरा सामन्याला सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामना पाहण्यासाठी झोपमोड करावी लागणार असल्याचं निश्चित आहे. हा सामना मोबाईलवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि जॉर्जिया वॉल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.