AUS vs IND : इंडिया-ऑस्ट्रेलिया 11 डिसेंबरला तिसरा सामना, किती वाजता सुरुवात?

| Updated on: Dec 10, 2024 | 6:57 PM

Australia vs Indian Women 3rd Odi : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा बुधवारी 11 डिसेंबरला होणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

AUS vs IND : इंडिया-ऑस्ट्रेलिया 11 डिसेंबरला तिसरा सामना, किती वाजता सुरुवात?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

इंडिया क्रिकेट मेन्स आणि वूमन्स टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मेन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने ही 3 सामन्यांची मालिका आधीच गमावली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना फार प्रतिष्ठेचा आहे.

ऑस्ट्रेलियाने सलग दोन्ही सामने जिंकत मालिकेवर नाव कोरलं. यजमान या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी तिसरा सामना हा प्रतिष्ठेचा आहे. आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड अंतिम सामना जिंकत शेवट गोड करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना केव्हा?

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना बुधवारी 11 डिसेंबरला होणार आहे.

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कुठे?

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना वाका स्टेडियम, पर्थ येथे होणार आहे.

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजून 20 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गर्थ, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, ॲनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि जॉर्जिया वॉल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.