मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यात अजिंक्य रहाणेसोबत मोहम्मद सिराजने कांगारूंना धक्के दिले. टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंना पहिला धक्का देत सिराजने सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड वॉर्नर याला माघारी पाठवत सिराजने संघाला यश मिळवून दिलं. त्यावेळी मार्नस लाबुशेन मस्त झोपला होता.
कॅमेरा त्याच्याकडे गेल्यावर तो मस्त आरामात झोपलेला दिसत होता. मात्र सिराजने तिला ही झोप फार काही वेळ घेऊ दिली नाही. कारण चौथ्या ओव्हरमध्ये त्याने डेव्हिड वॉर्नरला आऊट केलं. मग काय कॅमेरा परत एकदा लाबूशेनकडे दाखवण्यात आला. डेव्हिड वॉर्नर आणि ख्वाजा जास्त वेळ खेळतील असं वाटत होतं. मात्र सिराजने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.
मार्नस लाबुशेन वन डाऊन खेळायला येतो, तो पॅडअप होऊन बसला होता पण विकेट पडल्यावर त्याची झालेली तारांबळ पाहायला मिळाली. या दरम्यानचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
WHEEZINGGGG. WHAT A MOMENT. ?????#WTCFinal2023 pic.twitter.com/ALf3iDwFGT
— second new ball (@mamameyeah) June 9, 2023
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.