AUS vs IND : यशस्वी जयस्वाल याला दुसऱ्या कसोटाआधी मोठा झटका, काय झालं?

| Updated on: Dec 04, 2024 | 5:12 PM

Australia vs India Test Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा चौथ्याच दिवशी जिंकला. तर दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.त्यामुशे यशस्वी जयस्वालला मोठा झटका लागला आहे.

AUS vs IND : यशस्वी जयस्वाल याला दुसऱ्या कसोटाआधी मोठा झटका, काय झालं?
yashavi jaiswal and k l rahul team india
Image Credit source: PTI
Follow us on

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. यशस्वीने पर्थमथ्ये शतकी खेळी केली. यशस्वीने पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक करत जोरदार कमबॅक केलं. यशस्वीने या शतकी खेळीसह टीम इंडियाच्या विजयात निर्णायक योगदान दिलं. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा कसोटी सामना हा 6 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी यशस्वीला मोठा झटका लागला आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यशस्वीला या कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे.

यशस्वीला फटका

यशस्वीने पर्थ कसोटीत 161 धावांची खेळी केली. यशस्वीने यासह केन विलियमसन आणि हॅरी ब्रूक या दोघांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील मोठ्या अंतरामुळे यशस्वीला मोठा फटका बसला आहे. आयसीसी प्रसिद्ध केलेल्या कसोटी क्रमवारीत आता केन विलियमसन आणि हॅरी ब्रूक यशस्वीच्या पुढे निघाले आहेत. यशस्वीला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. यशस्वी चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. यशस्वीच्या खात्यात 825 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. पहिल्या स्थानी जो रुट कायम आहे. तर हॅरी ब्रूक 2 स्थानांच्या झेपेसह दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. तर केन विलियमनस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली यालाही फटका

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत सहाव्या स्थानी कायम आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विराट कोहली याला शतकी खेळीनंतरही फटका बसला आहे. विराटनेही पर्थमध्ये शतक केलं होतं. मात्र 2 सामन्यांमधील फरकाने विराटला नुकसान झालं आहे. विराटला एक स्थानाने नुकसान झालंय. विराट 13 व्या स्थानावरुन 14 व्या क्रमांकावर आला आहे. विराटच्या खात्यात 689 रेटिंग पॉइंट्स आहेत.

आयसीसी कसोटी क्रमवारीत कोण कुठे?

तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह याने पहिलं स्थान कायम राखलं आहे. आर अश्विन चौथ्या स्थानी कायम आहे. तर रविंद्र जडेजा याने सहाव्यावरुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.जडेजाच्या खात्यात 794 रेटिंग पॉइंट्स आहेत.