मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यात सामना होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचं पारडं या सामन्यात जड आहे. पण नेदरलँडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करत चुणूक दाखवून दिलं आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीची वाट सोपी होणार आहे. सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे.पण आपली स्वप्नपूर्ती करणारी टीम निवडताना बऱ्याच गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आपण निवडलेली टीम योग्य ठरेल का? पॉइंट्सच्या गणितात बाजी मारेल का? असे अनेक प्रश्न नक्कीच पडले असतील.त्यामुळे तुमची टीम निवडताना काही अंशी या खेळाडूंचा फायदा होऊ शकतो.
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. हे मैदान फलंदाजीसाठी पुरक आहे. असं असलं तरी या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळू शकते. पण दव पडल्यानंतर गोलंदाजीला कठीण जाईल. धावांचा पाठलाग करणारा संघ आरामात विजयी लक्ष्य गाठू शकतो. पण काही चुका केल्या तर ते महागात पडू शकतं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल.
ऑस्ट्रेलिया : डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, पॅट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवुड.
नेदरलँड : विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), लोगान व्हॅन बीक, रूलोफ वॅन डेर मेरवे, आर्यन दत्त, पॉल वॅन मीकेरेन.