पर्थ | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा गुरुवार 14 ते सोमवार 18 डिसेंबर दरम्यान पर्थ स्टेडियममध्ये पार पडणार आहे.या सामन्याला दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या एका दिवसाआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने प्लेईंग ईलेव्हनची घोषणा केली. त्यानंतर आता पाकिस्तान टीमने अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पाकिस्तान क्रिकेट टीमने एक्स अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
शान मसूदची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका आहे. बाबर आझम याने वर्ल्ड कपनंतर तिन्ही फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शान मसूद याची नियुक्ती करण्यात आली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून पाकिस्तानकडून दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. पाकिस्ताकडून आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद हे दोघे पदार्पण करणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने 2 खेळाडूंना उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना उपकर्णधार करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया 3 बॉलर आणि 1 स्पिनरसह मैदानात उतरणार आहे. तर 6 फलंदाजांचा समावेश आहे. तसेच स्पिनर नॅथन लायन याची टीममध्ये एन्ट्री झाली आहे. तर डेव्हिड वॉर्नर याची ही अंतिम कसोटी मालिका आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 69 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 69 पैकी 34 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 15 सामने जिंकण्यात यश आलंय. तसेच पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात केवळ 4 कसोटी सामने जिंकता आले आहेत. तसेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात अखेरचा कसोटी सामना हा 1995 साली जिंकला होता.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान दोन्ही संघ सज्ज
Captains with the Benaud-Qadir Trophy 🏆©️
The first Test starts tomorrow 🏏#AUSvPAK pic.twitter.com/do5x6yJ4RQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 13, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), टॅव्हिस हेड (उपकर्णधार), डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मिच मार्श, एलेक्स कॅरी, मिशेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवुड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शान मसूद (कॅप्टन), इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, सर्फराज अहमद (विकेटकीपर), सलमान अली आगा, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, आमिर जमाल आणि खुर्रम शहजाद.