पाकिस्तान क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला आहे. पाकिस्तानने दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने मात केली आहे. पाकिस्तानने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. पाकिस्तानने यासह ऑस्ट्रेलियात 7 वर्षांनंतर विजय मिळवला. पाकिस्तानला विजयासाठी 164 धावांचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानने विजयी आव्हान हे 141 बॉलआधी पूर्ण केलं. पाकिस्तानने 26.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 169 धावा केल्या. पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेला पहिला आणि मोठा विजय ठरला. तर पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विकेट्सच्या हिशोबाने हा संयुक्तरित्या पहिला मोठा विजय ठरला. पाकिस्तानने याआधी 11 डिसेंबर 1988 साली एडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सने पराभूत केलं होतं. पाकिस्तानने तेव्हा ऑस्ट्रेलियावर 34 बॉलआधी विजय मिळवला होता.
एडलेड ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तान टीमने टॉस जिंकला. कॅप्टन मोहम्मद रिझवान याने फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन रिझवानचा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि ऑस्ट्रेलियाला 35 ओव्हरमध्ये 163 रन्सवर गुंडाळलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. पाकिस्तानसाठी हरीस रौफ याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदी याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
सैम अयुब आणि अब्दुल्लाह शफीक या सलामी जोडीने पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने 137 धावांची भागीदारी केली. एडम झॅम्पा याने ही जोडी फोडली. मात्र तोवर पाकिस्तानने आपल्या बाजूने सामना झुकवला होता. झॅम्पाने सैम अयुबला 82 रन्सवर आऊट केलं. तर त्यानंतर अब्दुल्लाह शफीकने बाबर आझम याच्या सोबतीने पाकिस्तानला विजयी केलं. अब्दुल्लाह याने 69 बॉलमध्ये नॉट आऊट 64 रन्स केल्या. तर बाबर आझमने नाबाद 15 धावा केल्या.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड