AUS vs PAK : बाबर आझमचा धमाका, विराट कोहलीला पछाडलं, रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात

| Updated on: Nov 18, 2024 | 11:31 PM

Babar Azam Break Virat Kohli Record : पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला अखेर विराट कोहली निवृत्त झाल्यानंतरच त्याचा टी 20i क्रिकेटमधील तो रेकॉर्ड ब्रेक करण्यात यश आलं आहे.

AUS vs PAK : बाबर आझमचा धमाका, विराट कोहलीला पछाडलं, रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात
babar azam aus vs pak t20i
Image Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us on

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. बाबर अपयशी ठरल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र बाबरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात मोठा कारनामा करत टीकाकारांना चोख उत्तर दिलंय. बाबरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 41 धावांची खेळी केली. बाबरने यासह विराट टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. तर बाबरकडे आता रोहित शर्मा याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

बाबरने सामन्यातील पहिल्या डावात 28 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. बाबरने यासह टी 20I क्रिकेटमध्ये विराट कोहली याच्या धावांचा विक्रम मोडीत काढला. बाबर विराटला मागे टाकून टी 20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तर विराट कोहली याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर टी 20I मध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम आहे. बाबरला हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी आता फक्त 40 धावांची गरज आहे.

टी 20I मध्ये सर्वाधिक धावा

रोहित शर्मा – 4 हजार 231 धावा

बाबर आझम – 4 हजार 192 धावा

विराट कोहली 4 हजार 188 धावा

विराटला पछाडलं, आता बाबरचा रोहितच्या विक्रमावर डोळा

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : जोश इंग्लिस (कर्णधार आणि विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झम्पा.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : आगा सलमान (कर्णधार), साहिबजादा फरहान, बाबर आझम, हसीबुल्ला खान (विकेटकीपर), उस्मान खान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, जहांदाद खान, हरिस रौफ आणि सुफियान मुकीम.