AUS vs PAK 3rd Test | तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची प्लेईंग ईलेव्हन जाहीर

| Updated on: Jan 02, 2024 | 5:37 PM

Australia vs Pakistan 3rd Odi Playing 11 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात बुधवार 3 जानेवारीपासून तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

AUS vs PAK 3rd Test | तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची प्लेईंग ईलेव्हन जाहीर
Follow us on

सिडनी | मंगळवार 3 जानेवारीपासून 2 कसोटी सामन्यांना सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी सामने होणार आहेत. चारही संघांचा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. दक्षिण आफ्रिका 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकलीय. त्यामुळे पाकिस्तानसाठी तिसरा सामना हा प्रतिष्ठेचा झाला आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याचा हा अखेरचा कसोटी सामना असणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा वॉर्नरने आधीच केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमचा वॉर्नरला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानमध्ये 2 बदल

तर पाकिस्तान टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. ओपनर बॅट्समन इमाम उल हक आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी बाहेर पडले आहेत. तर त्याजागी सॅम अय्युब आणि साजिद खान या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. सॅम ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण करणार आहे.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन

तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, बाबर आजम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान(विकेटकीपर), सलमान अली आगा, साजिद खान, हसन अली, मीर हमजा, आमिर जमाल आणि सॅम अयूब (डेब्यूटंट)

ऑस्ट्रेलिया पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्यासाठी सज्ज

तिसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवुड.