कॅनबेरा | पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने टीममध्ये खेळाडूंना संधी दिली आहे, त्यानुसार पाकड्यांना पेस अटॅकने घेरण्याची तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टेस्टसाठी वेगवान गोलंदाज लान्स मॉरीस याला संधी दिली आहे. तसेच मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड यांचा समावेश आहे. तर ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन आणि मिचेल मार्श हे देखील पाकिस्तानची बॉलिंगने कसोटी घेतील. तसेच पॅट कमिन्स हा कांगारुंचं नेतृत्व करणार आहे.
उभयसंघातील पहिला सामना हा 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. सामन्याचं आयोजन हे पर्थमध्ये करण्यात आलंय. लान्स मॉरीस याचं कमबॅक ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचं आहे. लॉन्स मॉरीस याला गेल्या वेळेस प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजसाठी संधी देण्यात आली होती. मात्र लॉन्सला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र आता लान्सला अखेर टेस्ट डेब्यूची संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी 14 जणांची नावं जाहीर केली आहेत. या 14 जणांमध्ये 5 बॉलर आणि 2 ऑलराउंडर आहेत. हे 7 जण बॉलिंगमध्ये माहीर आहेत. त्यात पर्थची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी पूरक आणि मदतशीर ठरत आली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज कशाप्रकारे भेदक माऱ्याचा सामना करतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम ऑस्ट्रेलिया
When the first squad drops, you know the summer of Test cricket has officially arrived 🤩 #AUSvPAK pic.twitter.com/vjlcVlEYcv
— Cricket Australia (@CricketAus) December 3, 2023
पहिला सामना, 14 ते 18 डिसेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
तिसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कॅप्टन), आमिर जमाल, अब्दुल्लाह शफिक, अबरार अहमद, बाबर आजम, फहीम अशरफ, हसन अली, इमाम उल हक, खुर्रम खान, मीर हामजा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नौमान अली, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर), सऊद शकील आणि शाहीन शाह अफरीदी.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ,मार्नस लबुशेन, एलेक्स कैरी, कॅमरन ग्रीन, मिचेल मार्श, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलँड आणि लान्स मॉरिस.