AUS vs PAK | शाहिन अफ्रिदी याचा कांगारुंना ‘पंच’, पाकिस्तानने 367 धावांवर रोखलं

| Updated on: Oct 20, 2023 | 6:22 PM

Australia vs Pakistan | पाकिस्तानच्या गोलंदाजानी सुरुवातीला ढिसाळ कामगिरी केली. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीने घेतला. मात्र अखेरीस पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं.

AUS vs PAK | शाहिन अफ्रिदी याचा कांगारुंना पंच, पाकिस्तानने 367 धावांवर रोखलं
Follow us on

बंगळुरु | डेव्हिड वॉर्नर याच्या 150+ आणि मिचेल मार्श याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 367 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने वर्ल्ड कपमध्ये विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 400 पार मजल मारण्याची सहज संधी होती. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला अवघ्या काही ओव्हरमध्ये झटपट झटके दिले. मिचेल आणि वॉर्नर या सेट जोडीला आऊट केलं. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना स्वस्तात गुंडाळलं. मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे कांगारुंना 400 आधी रोखण्यात पाकिस्तानला यश आलं.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने 259 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनीही वैयक्तिक शतकं झळकावली. ही जोडी शाहिन अफ्रिदी याने तोडली. शाहिनने मिचेल मार्श याला 121 धावांवर आऊट केलं. मिचेलने 108 बॉलमध्ये 10 चौकार आणि 9 गगनचुंबी सिक्स मारले. मिचेलनंतर ग्लेन मॅक्सवेल आला आणि तसाच पहिल्या बॉलवर आऊट झाला. मॅक्सवेलनंतर स्टीव्हन स्मिथ आला.

पाकिस्तानने स्मिथला 7 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर याने 124 बॉलमध्ये 14 चौकार आणि 9 सिक्सच्या मदतीने 163 धावांची खेळी केली. वॉर्नरला द्विशतक करण्याची संधी होती. मात्र वॉर्नर अपयशी ठरला. वॉर्नरनंतर जोश इंग्लिस 13 धावा करुन आऊट झाला. मार्नस स्टोयनिस आणि मार्नस लबुशेन या दोघांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. मिचेल स्टार्क याने 2 रन्स केल्या. तर जोश हेझलवूड याला भोपळाही फोडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून शाहिन अफ्रिदी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हरीस रौफ याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर उस्मा मीरने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.