मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संघ सराव सामने खेळत आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये पाकिस्तान ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा मैदानात शादाब खान आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. बाबर आझम याला नेमकं काय झालं आहे, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. बाबर आझमच्या गैरहजेरीत मोहम्मद रिझवानला संधी का दिली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याबाबर या सामन्यापुरता कर्णधार असलेल्या शादाब खान याने उत्तर दिलं आहे. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर शादाबने याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली.
“बाबर आझम ठीक आहे. त्याला आराम हवा होता. रिझवान सुद्धा आराम करत आहे. पण मी कर्णधार आहे (हसत) आणि त्याच्याकडून मेहनत करून घेईल. आम्ही मागचा सामना हरलो होतो. पण आज आम्ही जिंकणार. आम्ही एक कुटुंब आहोत तसेच चांगले मित्र आहोत. ही आमच्या टीमची जमेची बाजू आहे. आम्ही एका टीमच्या स्वरुपात हारू किंवा जिंकू. आमच्या आत्मविश्वास मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.”, असं शादाब खान याने सांगितलं.
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंस याने सांगितलं की, खेळपट्टी चांगली दिसत आहे. ‘खेळपट्टी चांगली वाटत आहे. त्यामुळे आमच्या फलंदाजांना परखण्याची एक चांगली सधी आहे. 50 षटकांचा सामना होणार आहे. यात गोलंदाजांना 10 षटकं टाकावी लागू शकतात. त्यात काही अडचणीही येऊ शकतात.’, असंह त्याने पुढे सांगितलं.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सराव सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने 5 गडी गमवून 345 धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने 5 गडी गमवून 43.4 षटकात पूर्ण केलं.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सौद शकील, सलमान अली आगा, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, मोहम्मद वसीम.