कॅनबेरा | पाकिस्तान क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. पाकिस्तान या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या साखळीचा भाग आहे. पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. शान मसूद हा पाकिस्तान क्रिकेट टीमचं कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे.
बाबर आझम याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर, टी 20 आणि कसोटीमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका ही शानसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. त्याचं कारणही तसंच आहे. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात विजय मिळवताही आलेला नाही. इतकंच काय तर पाकिस्तानला गेल्या 28 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामना ड्रॉ करण्यातही यश आलेलं नाही.
पाकिस्तानला कायम ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रिकामी हाती परतावं लागलं आहे. पाकिस्तान पहिल्यांदा 1964 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यातील एकमेव सामना हा ड्रॉ राहिला होता. पाकिस्तानने 1976 आणि 1978 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोत्तम कामिगिरी केली होती. पाकिस्तानने या दोन्ही वेळेस टेस्ट मॅच ड्रॉ केली होती. या दोन्ही कसोटी मालिका अनुक्रमे 3 आणि 2 सामन्यांच्या होत्या. या दोन्ही मालिकांचा निकाल 1-1 असा लागला.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 37 कसोटी सामने खेळले आहेत. पाकिस्तानला त्यापैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात अखेरचा कसोटी सामना हा वसीम अकरम याच्या नेतृत्वात 1995-1996 साली मिळवला होता. मात्र या विजयाला फारसा काही अर्थ नव्हता, कारण ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची मालिका आधीच जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत कांगारुंनी पाकड्यांचा कसोटी मालिकेत सुपडा साफ केला आहे. तसेच कांगारुंनी पाकिस्तानला त्यांच्या घरात कसोटी मालिकेत 3-2 ने पराभूत केलं होतं.
पहिला सामना, 14 ते 18 डिसेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
तिसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कॅप्टन), आमिर जमाल, अब्दुल्लाह शफिक, अबरार अहमद, बाबर आजम, फहीम अशरफ, हसन अली, इमाम उल हक, खुर्रम खान, मीर हामजा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नौमान अली, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर), सऊद शकील आणि शाहीन शाह अफरीदी.