मुंबई : कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न भंगलं आहे. गेल्या 16 वर्षापासून कायम पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आताही ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांनी मालिका 2-0 ने जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 316 धावांचं आव्हान दिलं होतं. शान मसूद आणि बाबर आझमच्या जोडीमुळे हे आव्हान सहज गाठलं जाईल अशी स्थिती होती. मग काय ऑस्ट्रेलियन डिवचण्याची संधी सोडतात का? असाच काहीसा प्रसंग कसोटीच्या चौथ्या दिवशी पाहायला मिळाला. इतकंच काय स्टीव्ह स्मिथच्या कृतीने बाबर आझम नाराज झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या डावाच्या चौथ्या दिवशी टी ब्रेकनंतर हा प्रसंग घडला. शान मसूद आणि बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरले. तेव्हाच संधी हेरून स्टीव्ह स्मिथने रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पण बाबर आझमचा पवित्रा पाहून माफी मागून माघारी परतला.
बाबर आझम पंचांकडे स्टंप लाईनसाठी विचारणा करत होता. नेमका तेव्हा स्टीव्ह स्मिथ स्टंपच्या मागे आला आणि त्याने बाबरला डिवचलं. स्टीव्हच्या कमेंट्सने बाबर चांगलाच संतापलेला दिसला. त्याने क्षणाचाही विचार न करता आपली बॅट स्टीव्हकडे सोपवण्यासाठी केली. त्याच्या हावभावावरून तूच बॅटिंग कर असं सांगितलं असावं. पण स्टीव्ह स्मिथचं डिवचण्याचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे लगेचच हसत माफी मागून मागे सरकला.
Incredible banter!
Look at how Babar asks Smith only to bat, when he is getting ready to take guard and Smith goes 🙏
😂 😂 😂#AUSvPAK pic.twitter.com/SYnsDFP7ao
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 29, 2023
बाबर आझम दुसऱ्या कसोटी सामन्यातही काही खास करू शकला नाही. पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावा करून बाद झाला. कसोटीत 2023 या वर्षात बाबर आझमला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने पराभवाचं विश्लेषण करताना सांगितलं की, स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्शच्या खेळीमुळे आम्ही पराभवाच्या खड्ड्यात पडलो.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड