AUS vs PAK Test: एका चुकीमुळे पाकिस्तानला बसला 76 धावांचा फटका, काय झालं पाहा Video

| Updated on: Dec 28, 2023 | 6:10 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील तिसरा दिवस पार पडला असून ऑस्ट्रेलियाने 6 गडी बाद 187 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे आता 241 धावांची आघाडी आहे. पण ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखता आलं असतं पण एक चूक चांगलीच महागात पडली.

AUS vs PAK Test: एका चुकीमुळे पाकिस्तानला बसला 76 धावांचा फटका, काय झालं पाहा Video
AUS vs PAK, Video : तीच तीच चूक कितीवेळा करणार, एका चुकीमुळे पाकिस्तान संघ गेला बॅकफूटवर
Follow us on

मुंबई : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 241 धावांसह चांगली स्थिती आहे असं म्हणता येईल. पण ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखता आलं असतं. पण पाकिस्तानचे खेळाडू कायम माती खातात. याचं उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात दिसलं. गोलंदाज जीवाची बाजी लावून विकेटसाठी चेंडू टाकत असताना खेळाडू मात्र तोच कित्ता गिरवत आहे. त्यामुळे पाकिस्तानला हातचा सामना गमवण्याची वेळ येऊ शकते. एकतर ऑस्ट्रेलियन भूमीवर 250 च्या पार धावा चेस करणं कठीण आहे. त्यात आता ऑस्ट्रेलियाने 6 गडी बाद 241 धावांवर मजल मारली आहे. मात्र इथपर्यंत पोहोचणंही ऑस्ट्रेलियाला कठीण झालं असतं. अब्दुल्ला शफीकच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचा फटका सहन करावा लागला. मिचेल मार्शला स्वस्तात बाद करण्याची संधी होती. पण अब्दुल्ला शफीकने नको तीच चूक केली आणि 76 धावांचा भुर्दंड भरावा लागला.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने फक्त 16 धावांवर 4 गडी गमवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर गेली होती. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने सर्व धुरा मधल्या फलंदाजांवर आली होती. स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श विकेट वाचण्याची धडपड करत होते. पाचवा विकेटही मिळाला असता. ऑस्ट्रेलिया 46 धावांवर असताना मिचेल मार्शची विकेट मिळाली होती. तेव्हा त्याने फक्त 20 धावा केल्या होत्या. आमेर जमाल 16 वं षटक टाकत होता. त्याचा सामना करताना मिचेल मार्शचा झेल पहिल्या स्लिपला गेला. एकदम सोपा झेल होता. पण अब्दुल्ला शफीक पकडू शकला नाही.

शफीक या सामन्यात वारंवार चुका करत आहे. पहिल्या सामन्यातही त्याने उस्मान ख्वाजाचा झेल सोडला होता. तसेच डेविड वॉर्नरलाही जीवदान दिलं होतं. मार्शचा झेल 20 धावांवर असताना सुटला. त्यानंतर मार्श सावध झाला आणि फलंदाजी करू लागला. त्यानंतर मार्शने 96 धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. म्हणजेच मार्शमुळे 76 धावांची भर पडली. मिर हमजाच्या गोलंदाजीवर सलमान अघाने झेल पकडला आणि तंबूत पाठवलं.