मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक पराभव अंतिम फेरीच गणित बिघडवू शकतो. त्यामुळे दिग्गज संघ विजयी टक्केवारी कायम ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यात स्लो ओव्हर रेटचा फटकाही बसताना दिसत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडचं यामुळे मोठं नुकसान झालं. असं असताना दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ 66 षटकांचा झालाय पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 गडी बाद 187 धावा केल्या. तसं पाहिलं तर पहिल्या दिवशी 250 च्या पार धावसंख्या जायला हवी होती. पण तसं झालं नाही. असं असलं तरी पहिल्या दिवशी 3 गडी गमवून 187 धावा करून पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानला झटपट गडी बाद करण्यात यश आलं तर ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर जाईल. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाला 300 च्या आत रोखलं तर पाकिस्तानच्या विजयाच्या आशा वाढतील.
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. डेविड वॉर्नर 83 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 101 चेंडूत 42 धावा करून तंबूत परतला. संघाच्या 154 धावा असताना स्टीव्ह स्मिथ 26 धावा करून बाद झाला. तर दिवसअखेर मार्नस लाबुशेन नाबाद 44 आणि ट्रेव्हिस हेड नाबाद 9 धावांवर खेळत होते. पाकिस्तानकडून हसन अली, आमेर जमात, आघा सलमान यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आलं.
Honours even at the end of a rain-interrupted Day 1 in Melbourne.#WTC25 | #PAKvAUS | 📝: https://t.co/3PFGnHjZfL pic.twitter.com/Rqy0Aqe90w
— ICC (@ICC) December 26, 2023
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड