AUS vs PAK : पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान पराभवाच्या वेशीवर! तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 300 धावा

| Updated on: Dec 16, 2023 | 3:38 PM

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दोन गडी बाद 300 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 400 च्या पार धावा केल्या तर पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित असेल.

AUS vs PAK : पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान पराभवाच्या वेशीवर! तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 300 धावा
AUS vs PAK : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला दे धक्का! चौथ्या दिवशी होणार कसोटीचा फैसला
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठीचे साखळी फेरीचे सामने सुरु आहेत. प्रत्येक सामना अंतिम फेरीच्या गणितासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सामना जिंकला किंवा हरला, अन्यथा ड्रॉ झाला तरी विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑप्टस स्टेडियममध्ये सुरु असून तीन दिवसांचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे 300 धावांची आघाडी आहे. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 487 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने बऱ्यापैकी उत्तर देत सर्वबाद 271 धावा केल्या. यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 216 धावांची मजबूत आघाडी होती. या धावसंख्येपासून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने 2 बाद 84 धावा केल्या आणि आता 300 धावांची मजबूत आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 400 च्या पार धावा केल्या तर पाकिस्तानचा पराभव जवळपास निश्चित आहे.

पाकिस्तानच्या पहिल्या डावात इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक ही जोडी सोडली तर कोणी काही खास करू शकलं नाही. इमाम उल हकने 199 चेंडूंचा सामना करत 62 धावा केल्या. तर अब्दुल्ला शफीकने 121 चेंडूत 42 धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणी काही खास करू शकलं नाही. बाबर आझम पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरला होता. पण 21 धावांची खेळी करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून नाथन लायनने 3, मिचेल स्टार्कने 2, पॅट कमिन्सने 2, जोश हेझलवूडने 1, मिचेल मार्शने 1 आणि ट्रेव्हिस हेडने 1 गडी बाद केला.

दुसऱ्या डावात 216 धावांच्या मजबूत आघाडीसह ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली. पण दुसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला. डेविड वॉर्नर आपलं खातंही खोलू शकला नाही. तर मार्नस लाबूशेन संघाच्या पाच धावा असताना तंबूत परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव आला. पण उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरला. उस्मान ख्वाजाने नाबाद 34, तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 43 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करण्यात खुर्रम शहझादला यश आलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल स्टार्क, एलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लायन, जोश हेझलवूड.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, शान मसूद (कर्णधार), खुर्रम शहजाद, बाबर आझम, सउद शकील, शरफराज अहमद, सलमान अली आघा, फहीम अश्रफ, अमेर जमाल, शाहीन अफ्रिदी.