AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान कसोटी सामन्यात मोठा ड्रामा, पंचांसोबत लंचनंतर घडला असा प्रकार Watch Video

| Updated on: Dec 28, 2023 | 3:31 PM

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. पंच जागेवर नसल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लंचनंतर नेमकं काय झालं याबाबत जोरदार चर्चा रंगली. काही मिनिटांनी पंच जागेवर आले आणि सामना सुरु झाला.

AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान कसोटी सामन्यात मोठा ड्रामा, पंचांसोबत लंचनंतर घडला असा प्रकार Watch Video
AUS vs PAK, Video : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंच 'टाईम आऊट', लंचनंतर झाली अशी फजिती
Follow us on

मुंबई : प्रत्येक सामन्यात काही ना काही घडत असतं. त्याची चर्चा सर्वत्र रंगते. मग ते टाईम आऊट असो की आणखी काही..अनेकदा सामन्यात विघ्न येतात. कधी कुत्रे, तर कधी सापांची एन्ट्री होते. यामुळे सामन्याला उशीर होतो. पावसाने हजेरी लावली तर सामना सुरु होण्यास वेळ लागतो हे सर्व आतापर्यंत आपण पाहिलं आहे. पण क्रिकेट इतिहासात पंचांच्या दिरंगाईमुळे सामना सुरु होण्यास वेळ लागल्याची पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सुरु असून तिसरा दिवसाचा खेळ संपला. पण तिसऱ्या दिवशी लंचनंतर ड्रामा पाहायला मिळाला. त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. याला कारण ठरलं ते थर्ड अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ..कारण लंचनंतर ते त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर सामना सुरु करण्यास उशीर झाला.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये थर्ड अम्पायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते. लंच ब्रेकनंतर हा प्रकार घडला त्यामुळे सामना सुरु होण्यास पाच मिनिटांचा अवधी लागला. लंचनंतर तिसऱ्या पंचांकडे कॅमेरा गेला तेव्हा सदर बाब लक्षात आली. त्यानंतर समालोचकांनी लंचनंतर इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती सांगितली. त्यामुळे सीमारेषेवर उभे असलेल्या अधिकाऱ्यांना इलिंगवर्थच्या जागा घेण्यासाठी धावावं लागलं. तसेच ऑनफिल्ड पंच मायकल गॉफ आणि जोस विल्सन यांनी सामना सुरु होण्यास उशीर का होतोय याचं कारण सांगितलं.

तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने कमबॅक केल्याचं चित्र पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर 6 गडी 187 धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील आघाडीमुळे धावसंख्या 241 झाली आहे. पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला 300 धावांच्या आत रोखलं तर विजयाच्या मार्गावर कूच करता येईल. पण ऑस्ट्रेलियात 250 धावा करणंही खूप मोठी बाब आहे. चौथ्या दिवशी या सामन्याचं चित्र काय ते स्पष्ट होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मिर हमजा.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियॉन, जोश हेझलवूड.