AUS vs SL | ऑस्ट्रेलियाचं ‘झॅम्पा’स्टिक कमबॅक, श्रीलंकेला 209 वर गुंडाळलं

| Updated on: Oct 16, 2023 | 6:51 PM

Australia vs Sri Lanka Icc World Cup 2023 | ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला रोखत पॅकअप केलंय. आता दोघांपैकी कोणती टीम विजयी होते याकडे क्रिकेट चाहत्यांनी करडी नजर असणार आहे.

AUS vs SL | ऑस्ट्रेलियाचं झॅम्पास्टिक कमबॅक, श्रीलंकेला 209 वर गुंडाळलं
तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्पिनर अॅडम जम्पा असून त्याने ७१ सिक्सर दिलेत.
Follow us on

लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या दहाव्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 209 धावांवर रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 43.3 ओव्हरमध्ये 209 धावांमध्ये गुंडाळलंय. त्यामुळे कांगारुंना वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवण्यासाठी 210 धावांचं आव्हान मिळालं. आहे श्रीलंकेने 125 धावांची सलामी भागादारी केली. मात्र त्यानंतर कांगारुंनी जोरदार कमबॅक करत लंकादहन केलं. कांगांरुनी अवघ्या 84 धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यामुळे आता श्रीलंकेचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात की कांगारु पहिला विजय नोंदवतात, याकडे लक्ष असणार आहे.

श्रीलंकेची शानदार सुरुवात आणि घसरगुंडी

श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन कुसल मेंडीसचा बॅटिंगचा निर्णय सलामी जोडी पाथुम निसांका आणि कुसल परेरा या दोघांनी योग्य ठरवला. या दोघांनी सलामी शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं ठोकली. मात्र कॅप्टन पॅट कमिन्स याने ही सेट जोडी तोडली. पाथूम निसांका 61 धांवांवर आऊट झाली. इथून ऑस्ट्रेलियाने मुसंडी मारली आणि श्रीलंकेचा 84 धावात खुर्दा उडवला. एडम झॅम्पा याच्या फिरकीच्या जोरावर कांगांरुनी दोरदार कमबॅक केलं. श्रीलंकेने 84 धावांच्या मोबदल्यात 10 विकेट्स गमावल्या.

श्रीलंकेकडून कुसल परेरा याने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. तर चरिथ असलंका याने 25 धावा केल्या. महिश तीक्षणा याला भोपळाही फोडता आला नाही. तर दिलशान मधुशंका झिरोवर नॉट आऊट राहिला. तर 6 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि कॅप्टन पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल याच्या खात्यात 1 विकेट गेली.

एडम झॅम्पाने मॅच फिरवली

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, महेश तीक्षना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.